Omprakash Deora Peoples' co-op. bank Ltd history

बँकेचा गौरवशाली इतिहास...
देवादी देव महादेवाच्या भारत भुमितील १२ ज्योर्तीलिंगा पैकी श्रीक्षेत्र ओंढा नागनाथ या सुप्रसिद्ध ज्योर्तीलिंगा समिप आणि संताची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोली शहरातील एक कर्मठ,दूरदर्शी व सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव ठेवणारा तरुण तडफदार राजनेता व व्यापारीपुत्र श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी दिनांक २७ जानेवारी १९८३ रोजी सर्व पूर्व तयारीसह तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री मा. ना. श्री. शंकररावजी चव्हाण यांचे शुभहस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोलीची स्थापना करून महाराष्ट्र व आंध्रप्रदेश क्षेत्राच्या सर्वंगीण विकासाकरीता एकसुद्दढ बँकींग व्यवस्था दिली आहे.
बँकेचे स्थापनेचे वेळी मात्र ४२१ सभासद व एकूण भाग भांडवल रुपये ३.४६ लाखच्या शिदोरीचे पाठबळावर बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी बँकेची सुरुवात केली व त्यानंतर नियमित नियोजन व दूरद्दष्टी आधारे सन १९८३-८४ मध्ये बँकेची स्वत:ची इमारत बांधण्याचे ठरविले आणि दि. २५/०९/१९८७ रोजी बँकेने स्वत:च्या भव्य व सुसज्ज अशा हिंगोली शहरातील मोक्याचे ठिकाणी निर्मित वास्तु मध्ये प्रवेश केला.
अतिशय कमी समयावधीत आशय सन १९९३ पर्यन्त बँकेने आपला शाखा विस्तार मराठवाडा व विदर्भातील एकूण ७ जिल्ह्यात केला व आज बँक महाराष्ट्रातील ११ आणि आंध्रप्रदेश मधील १ असे एकूण १२ जिल्ह्यात आपल्या २४ शाखांच्या माध्यमातुन (चोपडा शाखा समाविष्ट करून) तळागाळातील जन सामान्यांच्या आर्थिक विकासासाठी बँकींग सेवा देत आहे.
विकासाकडे अग्रेसर होत बँकेने दिनांक ०९/१२/१९९९ रोजी बहुराज्यीय (मल्टीस्टेट) बँक होण्याचा दर्जा प्राप्त केला आणि तसे प्रमाणपत्र तत्कालीन केंद्रीय जड उघोग मंत्री मा. ना. श्री. मनोहररावजी जोशी यांचे हस्ते प्राप्त केले आहे.
बँकेच्या कार्यातील गुणवत्ता, आर्थिक सुदृढता आणि व्यावसायिक सुरक्षिततांचे आकलन क्वॉलिटी सर्टीफिकेशन सर्व्हीसेस (इंडिया) IQCS व्दारा करण्यात आले व त्यांचे व्दारे दि. १०/१२/२०१० रोजी ISO ९००१:२००८ हे गुणवत्ता प्रमाणपत्र, एक्रिडीएशन सर्व्हीसेस फॉर सर्टीफिकेशन बॉडीज् (युरोप) लि., या संस्थेने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार देण्यात आले आहे.
आपल्या व्यवसाय विकासाची गती कायम ठेवत सन १९९७-९८ मध्ये बँकेने आपले व्यवहार संगणीकृत करण्यास प्रारंभ करून सन २००३-०४ मध्ये बँकेने सर्व शाखांचे संपूर्ण बँकींग व्यवहार संगणीकृत करून ई. डी. पी. विभागाची मुख्य कार्यालयात स्थापना पण केली आहे. बँकेने आता एस. व्ही. सी. बँक लि. मुंबई चे 'जिनियस सॉफ्टवेअर' खरेदी करून ग्राहक सेवा अधिक विस्तारीत करण्याच्या उद्देशाने कोअर बँकींग प्रणाली बँके मध्ये लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याची कार्यवाही प्रारंभ केली आहे.
आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. : बँकेच्या ग्राहकांना त्यांचा बाहेर गावचा निधी (Funds) त्वरीत प्रेषण किंवा अहरण विनाविलंब करता यावे यासाठी बँकेने आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. व्यवस्था सुद्धा एप्रिल २०११ पासून प्रारंभ केली आहे.
बँकेला सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार
देवून विविध संस्थाव्दरे सन्मानीत केले आहे.

सन १९९४-९५ पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
सन १९९५-९६ पद्मश्री कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
सन १९९६-९७ उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणुन पुरस्कार (नॅशनल इन्टीट्यूट फॉर को-ऑप. डेव्हलपमेन्ट अॅन्ड रुरल मेन्जमेन्ट अमरावती)
सन १९९७-९८ युवकमुद्रा कराड - साताराचे विद्दमाने आयोजित राज्यस्तरीय प्रतियोगेत बँकेला नेत्रददिपक यशा बद्दल पुरस्कार
सन १९९८-९९ पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
सन १९९९-०० स्मृति चिन्ह व सत्कार, '८ व्या अखिल भारतीय कॉन्फ़रन्स, नवी दिल्ली' मध्ये नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक अॅन्ड क्रेडीट सोसायटी लि. NAFCUB कडून देण्यात आला.
सन २००१-०२ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार, दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक फेडरेशन लि., मुंबई कडून
सन २००४-०५ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार,दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक असोसिएशन लि., मुंबई कडून
सन २००५-०६ राज्यातील उत्कृष्ट बँक म्हणुन पुरस्कार,दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक असोसिएशन लि., मुंबई कडून
सन २००९-१० पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
सन २०१०-११ जीवन गौरव पुरस्कार बँकेचे मा. अध्यक्ष श्री. देवडा यांना दि. महा. स्टेट को-ऑप. बँक फेडरेशन लि., मुंबई कडून
बँकेने आपल्या स्थापना वर्षा पासून लाभार्जन करून तसेच आपल्या सन्माननिय सभासदांना प्रत्येक वर्षी लाभांश एवम स्फॉफला त्याच दराने बोनस वितरीत करून, आपल्या ग्राहकांचे सेवे करीता खालील शाखासाठी स्वतःच्या इमारती बांधल्या आहेत.
१. प्रधान कार्यालय, २. शाखा हिंगोली, ३. देऊलागांवराजा, ४. जालना, ५. नांदेड, ६. औरंगाबाद, ७. जवळाबाजार(निर्माणाधीन), शाखा परभणी, बोरी आणि जिंतूर मध्ये स्वतःची इमारत उभारणे करीता बँकेने जागांची खरेदी केलेली आहे. सोबतच निकट भविष्यात सर्व शाखांसाठी स्वतःच्या इमारतीचे निर्माण प्रस्तावित आहे. बँकेने सदैव ग्राहक सेवेस प्राधान्य दिले आहे.
आपले स्थापनेपासून सतत आज पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभे पुर्वी बँकेचे लेखा परिक्षणाचे कार्य पुर्ण करून अंकेक्षक व्दारा प्रमाणित ताळेबंद व नफा तोटा पत्रकासह वार्षिक अहवाल प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील आपली बँक एकमात्र आहे.
भारतामध्ये सर्व बँका एन.पी.ए. कर्ज (थकीत कर्ज) च्या वाढीमुळे भयग्रस्त आहेत.आशा परिस्थितीत ही बँकेने नेट एन.पी.ए. ची टक्केवारी "० %" वर्ष २०११-१२ मध्ये पण कायम ठेवले आहे, जे प्रशंसनीय आहे.
वर्ष २०११-१२ मध्ये वैधानिक लेखा परिक्षण मध्ये आपल्या उच्चतम कार्य प्रणाली, वार्षिक निष्पादन तसेच आर.बी.आय., सहकार खाते, बँकेचे मा. संस्थापक व अध्यक्ष, बँकेचे मा. संचालक मंडळाचे सर्व सन्मानीय सदस्य, शाखा समित्यांचे मा. अध्यक्ष व सदस्य बँकेचे हितचिंतक, ग्राहक, सभासद यांचे वेळोवेळी उपलब्ध झालेल्या मार्गदर्शनाचे आधारे व पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँक परिवारातील सर्व सहकाऱ्यांचे मेहनतीच्या बळावर बँकेने "A +" ग्रेड दर्जा कायम ठेवला आहे.
पीपल्स बँके मधील कार्यप्रणाली व नियोजनाचे शिदोरी सदैव सोबत ठेवून बँकेचे म. अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजीअ देवडा यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशनची स्थापना आणि भव्य इमारतींचे निर्मिती मध्ये आपल्या अह्म भूमिकेचा निर्वाह केला आहे, ते वरील दोन्ही संस्थापक अध्यक्ष पण राहिले आहेत. श्री. ओमप्रकाशजी देवडा यांना महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदे कडून 'सहकाररत्न' या पुरस्काराने गौरवान्वीत करण्यात आले त्याचा पीपल्स को-ऑप. बँकेला सार्थ अभिमान आहे.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी देवडा यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई व्दारे कै. विष्णुअण्णा पाटील ' जीवन गौरव ' पुरस्कारांने दि. १० जानेवारी, २०१२ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकाडमी (रविंद्र नाटय मंदिर) प्रभादेवी, मुंबई येथे मा. श्री नितिनजी गडकरी (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी) यांचे व्दारे व मा. प्रा. श्री संजयजी भेंडे (कार्याध्यक्ष), दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि., मुंबई यांचे उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे. जे आमचे बँकेला भुषणावह आहे. ओमप्रकाश देवडा पीपल्स को - ऑपरेटिव्ह बँक आपल्या ग्राहकांच्या सोयी विस्तारीत करणे करिता 'Any time any where' ही कोअर बँकींग प्रक्रिया प्रारंभ करण्याकडे अग्रेसर आहे. मागील वर्षातील बँकचा व्यवसाय निष्पादनाचे हायलाईटस (क्षणचित्रे) मागील पानावर देण्यात येत आहे.

Privacy Policy l Terms & Conditions l Disclaimer l Sitemap l Contact Us

Subscribe