Loan Account

व्यापारी कर्जा करिता घ्यावयाची कागदपत्रे
१) कर्ज मिळवण्याकरीता व्यवसायाच्या नावाने असलेल्या लेटर हेडवर स्वतंत्र अर्ज.
२) कर्ज मागणी अर्ज करते वेळेस बँकेत चालु खाते उघडावे लागेल व अर्ज मागणी रकमेच्या ५% रक्कम खात्यात भरावी लागेल.
३) स्टेशनरी चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसींग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळी रकमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल जी परत होणार नाही व उर्वरीत ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी.
४) बँकेत कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळेस....
१) शेअर्स अनामत रक्कम रुपये १०००/- व नियमानुसार प्रवेश फी भरावी.
२) रुपये १ लाख वरील कर्ज प्रकरणाकरिता सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळप्रत व सत्यप्रत) सादर करावे लागेल.
५) रहीवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र.
६) कर्जमागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो.
७) जामिनदाराचे उत्पन्न व सांपत्तिक स्थितीचे पुरावा दाखल कागदपत्रे.
८) व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे नोंदणी आणि प्रमाणपत्र व परवान्याच्या प्रती.
९)व्यवसाय भागीदारी असल्यास भागीदारी करारपत्र.
१०)आयकर असेसमेंट (चालान इत्यादी), विक्रीकर व व्यवसाय कर भरल्याच्या चालानची सत्यप्रती.
११) व्यवसायचे मागील तीन वर्षाचे (व्यापारखाते, नाफातोताखते व ताळेबंद) आर्थिक पत्रके.
१२) व्यवसायाचे मागील आर्थिक वर्षाचे ऑडीट झाले नसल्यास प्रोव्हिजनल बलेन्सशीट.
१३) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे खरेदीखत,पी.आर.कार्ड,ग्रामपंचायत असल्यास नमुना नं.८ व नगरपरिषद असल्यास नमुना नं.
४३,मालमत्तेची कर पावती व मोकळा प्लॉट असल्यास(एन.ए.आदेशाची प्रत)आकृषित धारा भरल्याची पावती व इतर आवशक कागदपत्रे.
१४) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन हे बँकेने निउक्त केलेल्या सरकार मान्य व्ह्यलुअर मार्फतच घेणे.
१५) कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मागील १२ वर्षाचे सर्च रिपोर्ट.
१६) व्यवसायातील यंत्रसामुग्रीची यादी आजरोजीच्या किमतीसह देणे.(बिलांच्या सत्यप्रती जोडणे)
१७) मागणी केलेल्या कर्जाच्या परतफेडी संबंधी कर्जाच्या कालावधी करीता सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट घेणे.
१८) खालील बाबींची पूर्तता झाल्यानंतरच कर्जाचे वितरण होईल.
१) आवश्यक ती सर्व कागदपत्रे.
२) नियमाप्रमाणे आवश्यक शेअर्स रक्कम.
३) नियमाप्रमाणे प्रोसेसिंग फीज व सवर्हीसटक्स भरावा लागेल.
४) ५ लाखाच्या वरील कर्ज प्रकरणाकरीता आवश्यक अप्रायझल फीज भरावी.
१९) अर्जदाराने या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास किंवा इतर बँकेत चालु अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याचा कमीत कमी दोन वर्षाचा खाते उतारा जोडणे.


टर्मलोन करिता घ्यावयाची कागदपत्रे
१) कर्ज मिळवण्याकरीता व्यवसायाच्या नावाने असलेल्या लेटर हेडवर स्वतंत्र अर्ज.
२) कर्ज मागणी करते वेळेस बँकेत चालु खाते उघडावे लागेल व अर्ज मागणी रकमेच्या ५% रक्कम खात्यात भरावी लागेल.
३) स्टेशनरी चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसींग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सादर करते वेळी कर्ज मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल जी परत होणार नाही व उर्वरीत ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी.
४) बँकेत कर्ज मागणी अर्ज सादर करतेवेळेस....
१) शेअर्स अनामत रक्कम रुपये १०००/- व नियमानुसार प्रवेश फी भरावी.
२) रुपये १ लाख वरील कर्ज प्रकरणाकरिता सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळप्रत व सत्यप्रत) सादर करावे लागेल.
५) रहीवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र देणे.
६) कर्जमागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो.
७) जामिनदाराचे उत्पन्न व सांपत्तिक स्थितीचे पुरावा दाखल कागदपत्रे.
८)अर्जदाराचे व्यवसाय असल्यास व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच व्यवसायाचे आर्थिक पत्रके,शेते असल्यास शेतीच्या उत्पन्नाचा दाखला,घरभाडे मिळत असल्यास भाडे करारपत्र व भाड्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचे पत्रक देणे. तसेच अर्जदार नौकरी करीत असल्यास पगारपत्रक आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
९)मागणी केलेल्या कर्जाच्या परतफेडी संबंधी कर्जाच्या कालावधीकरिता प्रोजेक्ट रिपोर्ट देणे(यामध्ये विविध मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा उल्लेख करावा.)
१०)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे खरेदीखत,पी.आर.कार्ड,ग्रामपंचायत असल्यास नमुना नाम.८ व नगरपरिषद असल्यास नमुना नाम.४३,मालमत्तेची कर पावती व मोकळा प्लॉट असल्यास(एन.ए.आदेशाची प्रत) अक्रुशीत. धारा भरल्याची पावती व इतर आवशक कागदपत्रे.
११)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन हे बँकेने निउक्त केलेल्या सरकार मान्य व्ह्यलुअर मार्फतच घेणे.
१२)कर्जास तारण देत असलेल्या मालमत्तेचे मागील १२ वर्षाचे सर्च रिपोर्ट.


घर बांधणी कर्ज असल्यास वरील कागदपत्राशिवाय खालील कागदपत्रे घेणे.
१)बांधकामाचे एस्तिमेत,मंजूर नकाशा,जागेचे व त्यावर पूर्वी झालेल्या(अस्तित्वात असलेल्या) बांधकामाचे मुल्यांकन प्रमाणपत्र देणे. २)प्लॉट,घर किवा फ्ल्याट विकत घेत असल्यास.....
१)इसार पावती
२)मालमत्तेचे संपूर्ण कागदपत्रे
३)अट क्र.६,७vव ८ नुसार सर्व कागदपत्रे जोडणे.
३)मशिनरी इत्यादी खरेदी करीत असल्यास...
१)कोटेशन जोडणे
२)कोटेशनच्या ४०% रक्कम करंट खात्यात भरावी लागेल.
४)अर्जदाराने या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास किंवा इतर बँकेत चालू अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याच्या कमीत कमी दोन वर्षाचा खत उतारा जोडणे.


पगार तारण कर्जाकरिता घ्यावयाची कागदपत्रे
१)स्टेशनरि चार्जेस पोटी रुपये ५०/- भरणा करावे तसेच प्रोसेसिंग फी पोटी कर्ज मागणी अर्ज सदर करते वेळेस कर्ज मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल.जी परत होणार नाही व उर्वरित ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावे.
२)रहिवाशी तासेस्च वयाचे प्रमाणपत्र देणे.
३)कर्ज मागणी अर्जासोबत अर्जदार व जमीनदार यांचे फोटो जोडणे.
४)मागील महिन्याचे पगारपत्र जोडणे.
५)सक्षम अधिकार्याचे स्वाक्षरीचे पगार कपातपत्र व अधिकारपत्र.
६)अर्जदाराचे हुद्द,नौकरीत रुजू झाल्याचा दिनांक,कायम झाल्याचा दिनांक व निवृत्ती दिनांक तसेच जी.पी.एफ., एकूण पगार व एकूण कपात एतदि दर्शविणारे प्रमाणपत्र घेणे.
७)शाळा किंवा महाविद्याला असल्यास शासनाच्या मान्यतेचे व शासकीय अनुदान मिळत असल्याचे प्रमाणपत्र.
८)जमिन्दाराचे उत्पन्नाचे व सांपत्तिक स्थिती दर्शविणारे कागदपत्रे घेणे.
९)अर्जदाराने या आगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतलेले असल्यास किवा इतर बँकेत चालू अथवा बचत खाते असल्यास संबंधित खात्याचा कमीत कमी दोन वर्षाचा खाते उतारा जोडणे.


      जुन्या वाहनाकरीता द्यावयाची कागदपत्रे

नव्या वाहनाकरीता द्यावयाची कागदपत्रे

 

१) आर.सी. बुक

१) प्रोफार्मा इन्व्हाईस

२) मुल्यांकन पत्र

२) दरपत्रके

३) परमीटची प्रत

३) मार्जीन मनी

४) विमा भरल्याची प्रत

४) ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेले पत्र

५) कर बुक प्रत

५) खात्याबाबत तपशील

६) वाहन परिस्थितीची माहिती

६) राहत्या घराचा पुरावा

७) भाडे / विद्युत बिल

७) व्यवसायाचा पुरावा

८) धंधाचे स्वरूप

८) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

९) रेशन कार्डाची प्रत

९) ताळेबंदपत्रक , नफा - तोटा पत्रक

१०) छायाचित्र (अर्जदार व जामीनदार)

१०) छायाचित्र (अर्जदार व जामीनदार)

११) खाते उतारा

११) इतर कागदपत्रे

१२) उत्पन्नाचे पुरावे

 

१३)आयकर विवरण

 

१४)ट्रान्सपोर्ट कंपनीतून पत्रव्यवहार

 Subscribe